आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भंडारदरा'ने ओलांडला 50 टक्क्यांचा टप्पा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - अकोले तालुक्यात मंगळवार, बुधवारपासून सक्रिय झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन शनिवारी सकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठ्याने ५० टक्क्यांची रेषा ओलांडून तो ५१.१० टक्केवर पोहोचला. वीजनिर्मिती प्रकल्प भंडारदरासाठी धरणाच्या उन्नेन विहिरीतून ८४९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

 

शनिवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतील रतनवाडी येथे पावसाने १६०० मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत घाटघर येथे १८२ व रतनवाडी येथे १६६ म्हणजे जवळपास सात इंच पाऊस पडला. या पावसाळ्यात आजपर्यंत घाटघर येथे १६२४ व रतनवाडी येथे १६३६ मिलिमीटर पाऊस पडला. पांजरे १३२ (१२६१),भंडारदरा ११७ (१०४२), निळवंडे १३ (२३३), आढळा २ (९३), अकोले ८ (२३२), कोतूळ ३ (१३३) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कंसातला पाऊस १ जून २०१८ पासून झालेल्या पावसाचे आहेत.

 

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सकाळी सहा वाजता ५६४१ दलघफू म्हणजे ५१.१० टक्केवर पोहोचला आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा १०५८ दलघफूवर म्हणजे १२.७१ टक्के आहे. मुळा (ज्ञानेश्वर सागर) धरणाचा पाणीसाठा ७२३८दलघफू म्हणजे २७.८३ टक्के झाला आहे. देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली नसून पाणीसाठा १६८ दलघफूवर स्थिर आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा ४०.६७२ टीएमसी म्हणजेच ३९.५८ टक्केवर पोहोचला असून थरणातील उपयुक्त पाणीसाठा १४.६०६ टीएमसी १९.०५ टक्के आहे.

 

या वर्षांत १ जून नंतर भंडारदरा धरणात ४७४३ दलघफू व मुळा (ज्ञानेश्वर सागर) धरणात २५७८ दलघफू नवीन पाणी आले आहे. मागील आठवड्यात पाणलोट क्षेत्रात पावसाची घट झाली होती. पण मंगळवारपासून त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे बुधवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात ४७२ दलघफू व मुळा (ज्ञानेश्वर सागर) धरण्यात ५३१ दलघफू नवीन पाणी आले आहे. निळवंडे धरणात नवीन १४२ दलघफू पाणी आले असून पाणीसाठा २५४६ दलघफूवर पोहोचला आहे.

 

भंडारदरा, कळसुबाई, हरीश्चंद्रगड परिसरातून सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणलोटातून भंडारदरा व मुळा धरणातून पाण्याच्या पातळीत चांगली वाढ होत आहे. सर्वत्र सरीवर सरी सुरू आहेत. पाणलोटातून ठिकठिकाणी ओढे-नाले जोरदारपणे वाहू लागले आहेत. शेकडोंच्या संख्येने डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या जलप्रपादाने वातावरण अाल्हाददायक बनले आहे. इथला सर्व परिसराच धुक्यात हरवला असल्याचे चित्र अधूनमधून दिसते आहे.

बातम्या आणखी आहेत...