आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटघरला १४ इंच पाऊस; भंडारदरा ७० टक्के भरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर व रतनवाडीसह संपूर्ण परिसराला दोन दिवस अतिवृष्टीचा तडाखा बसला. सोमवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत घाटघरला ढगफुटीचा सामना करावा लागला. घाटघरला ३४१ (१४ इंच) व रतनवाडीत ३२७ मिलिमीटर पाऊस पडला. रविवारी घाटघरला २६९, तर रतनवाडीस २४७ मिलिमीटर पाऊस झाला होता. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ७५६ दलघफू वाढ झाली. 


सोमवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील साठा ७०२५ दलघफूवर (६३.६३ टक्के) पोहोचला. धरणात २४ तासात तब्बल ७७२ दलघफू नव्याने पाणी आले. निळवंडे धरणसाठ्यात नव्याने ३६१ दलघफू पाणी वाढले. दोन्हीही धरणात १ टीएमसीपेक्षा जास्त म्हणजेच तब्बल ११३३ दलघफू नवीन पाणी आले. सोमवारी सकाळी निळवंडेचा पाणीसाठा १६३९ दलघफू (१९.६९ टक्के) झाला. 

बातम्या आणखी आहेत...