आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यात तलवारी हातात घ्याव्या लागतील, संभाजी भिडे यांचे नगरमध्ये वादग्रस्त वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- रागडावर लवकरच  शिवाजी मराजांचे सुवर्ण सिंहासन तयार करण्यात येणार आहे. या सिंहासनाच्या संरक्षणासाठी धारकरी सध्यातरी हातात काठ्याच घेऊन जातील पण वेळ पडली तर त्यांना भविष्यात हाती तलवारी घ्याव्या लागतील असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले आहे. ते टिळक रोड येथे सभेत बोलते होते. कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही सभा झाली. 

 

भिडे यांनी सभेत रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' तुकडी तयार करण्याची घोषणा केली. त्यांनी रायगडावर उभारण्यात येणा-या सुवर्ण सिंहासनाविषयी माहिती दिली. तसचे दोन हजार धारकऱ्यांचा तुकडीत समावेश असेल व ते रोज गडावर पहारा देतील असेही सांगितले. 

संभाजी भि़डे यांनी सांगितले, सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा गळा काढला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे काय चालू आहे, म्हणून टीका केली जाईल. त्यामुळे  सध्यातरी याठिकाणी धारकरी काठ्याच घेऊन जातील. परंतु, भविष्यात त्यांच्यावर तलवारी हातात घेऊन जाण्याची वेळ नक्कीच येणार आहे.

 

'अहमदनगर' नव्हे 'अंबिकानगर' करा 
भिडे गुरुजी यांनी अहमदनगरचा उल्लेख ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अंबिकानगर’ असा करण्याचे आवाहन केले. त्यांनी नगर शहराच्या नामांतराचा प्रस्तावच या सभेत मांडला.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...