आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छिंदमच्‍या बेताल वक्तव्यामुळे प्रायश्चित्त; भाजपची उपमहापाैर निवडणुकीतून माघार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत गुरुवारी १४ दिवसांची वाढ झाली. दरम्यान, छिंदमच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. गुरुवारी उमेदवारी अर्जाची शेवटची मुदत होती. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. छिंदमच्या बेताल वक्तव्याचे प्रायश्चित्त म्हणून प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार गांधी यांनी दिली.  


पाेलिस कोठडी संपल्याने गुरुवारी छिंदमला कोर्टापुढे हजर केले जाणार होते. मात्र, पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत वाढीचा अर्ज केला. २ दिवसांवर येऊन ठेपलेली शिवजयंती, छिंदम याचे फोनवरील संभाषण तपासणे, तसेच छिंदम याच्या जिवाला धोका आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी छिंदम याच्या कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...