आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम शिंदेंच्या स्वीय सहायकावर खंडणीचा गुन्हा दाखल, वाळूचा ठेका चालवायला मागितले 10 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-  जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहायकासह मनसे शहर जिल्हाध्यक्षावर एका ठेकदाराला वाळूचा ठेका चालवण्याच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी रात्री केली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बापू बाचकर आणि मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजानन राशीनकर यांनी ठेकेदार नंदकुमार गागरे (राहणार देसवंडी तालुका राहुरी) यांना 10 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दोघांनी दिली. नागरे यांनी दिलेल्या फिर्यादित जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी ही खंडणी मागून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादित म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...