आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे अामिष दाखवून बलात्कार व गर्भपात, सहा जणांविरुद्ध गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - दत्तनगर परिसरात राहणाऱ्या युवतीवर लग्नाचे अामिष दाखवून बलात्कार करून तिचा बळजबरीने गर्भपात केला. मौलानासमोर बळजबरीने विवाह लावला. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

१८ वर्षांच्या पीडित युवतीने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सकलेन उस्मान बागवान, त्याची आई शहानवाज बागवान, वडील उस्मान इस्माईल बागवान, शब्बू लियाकत बागवान, शाबीर उस्मान बागवान व शहाबुद्दीन सिकंदर बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

 

युवतीने फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सिकंदर उस्मान बागवान यांच्या भंगार दुकानात मे २०१७ पासून काम करत होतो. तेथे कामास असलेल्या सकलेन बागवान याच्याशी ओळख झाली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. आपण दोघे पळून जाऊ, असे सांगत त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पाच महिन्यांपूर्वी वापी (गुजरात) येथे आईकडे पळून जाऊ, असे तो म्हणाला. परंतु आपण नकार दिल्याने त्याने वापीला जाऊन लग्न करू असे सांगितले. आम्ही वापीला गेलो. तीन डिसेंबर २०१७ रोजी सकलेन दुपारी कार घेऊन आला. आम्ही वापी येथे त्याच्या घरी गेलो. मला दिवस गेल्याचे सांगितले. नंतर सकलेन व त्याच्या आईने रुग्णालयात दाखल करून मला न सांगता गर्भपात केला. याबाबत विचारणा केली असता त्याच्या आईने मी सांगते तसे कर, अन्यथा तुला जाळून टाकीन, अशी धमकी दिली.

 

नंतर त्याची आई शहानवाज व वडील उस्मान बागवान यांनी मला मालेगाव येथे नेले. तेथील मौलानाकरवी सकलेन याच्याशी जबरदस्तीने विवाह लावला. त्यावेळी सिकंदर, लियाकत व आणखी तीन-चार जण होते. त्यांनी पुन्हा वापी येथे नेले. पुन्हा दिवस गेल्याने त्याने गर्भपात करण्याचा आग्रह धरला. मी नकार दिल्याने गर्भपात केला नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर मी श्रीरामपूर येथे निघून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे अधिक तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...