आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजारांची खंडणी मागणाऱ्या पोलिसांवर गुन्हा, दोन्‍ही पोलिस फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- येथील दोन पोलिसांविरुध्द खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही फरारी असून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे या प्रकरणी तपास करत आहेत. चापडगाव येथील अशोक एकनाथ गाडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यांचे मित्र आनंद पातकळ यांची ट्रॅक्टर टॉली घराकडे येत असताना हेड कॉन्स्टेबल अंकुश दहिफळे व गाडे यांनी ट्रॅक्टर अडवला. तू वाळू वाहतूक करतो. ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घे, नाहीतर ५ हजार रुपये दे अशी मागणी केली.

 

बातम्या आणखी आहेत...