आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्ड्याच्या लढाईचा स्मृतिदिन मोटारसायकल रॅलीने साजरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्डा - खर्ड्याच्या लढाईचा स्मृतिदिन रविवारी मोटारसायकलची रॅली काढून साजरा झाला. हजारो शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते. खर्ड्याची ऐतिहासिक लढाई ११ मार्च १७९५ रोजी झाली. मराठ्यांच्या इतिहासातील या अभिमानस्पद प्रसंगाला रविवारी २२३ वर्षे पूर्ण झाली. मराठ्यांच्या शेवटच्या विजयाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या खर्डा परिसराला त्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेआहे. खर्ड्याच्या किल्ल्यावर शिवप्रतिमेचे पूजन शिवप्रेमी सरपंच संजय गोपाळघरे यांनी केले.


याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, वैजीनाथ पाटील, विकास शिंदे, अनिल धोत्रे यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. नंतर शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली खर्ड्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रणटेकडीवर नेण्यात आली. ज्या ठिकाणी युध्द होऊन मराठ्यांना विजय मिळाला, त्या ठिकाणी शिवप्रेमींनी विजयस्तंभ उभारून त्याचे पूजन केले. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा. धनंजय जवळेकर म्हणाले, खर्ड्याची लढाई ही एकतेचा संदेश देणारी आहे. हर हर महादेव, जय शिवाजीच्या गर्जनेने यावेळी परिसर दुमदुमला. शुभम रणभोर यांनी शिवप्रेमींचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...