आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल बँकेने मुद्रा लोन नाकारून केली मानहानी; बँकेविरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पळशी शाखाधिकाऱ्यांनी मुद्रा लोन नाकारण्यासाठी खोटे कारण दाखवून मानहानी केली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वनकुटे यांथील संतोष बबन केदारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. 


तक्रारीत म्हटले आहे, कापड दुकानासाठी मुद्रा लोन मंजुरीसाठीची फाईल शाखाधिकारी दत्ता थोरात यांच्याकडे दिली होती. ती देण्याअगोदरच मी तुमची फाईल रद्द करेन, या संदर्भात माझ्याकडे भरपूर कारणे आहेत, असे ते म्हणाले. त्यानंतर मी बँकेच्या जिल्हा कार्यालयात कुमार गौरव यांच्याकडे फोनवरुन माझी तक्रार दिली. फाईल रद्द करण्यासाठी मोठे कारण नसताना चुकीचे कारण देत तुम्ही मुंबईला शिक्षक असताना शिक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करुन तेथील मुख्याध्यापकांनी तुम्हाला कामावरुन काढून टाकले, असे खोटे कारण दिल्यामुळे माझी व माझ्या कुटुंबीयांची मानसिकता बिघडून माझी गावात व परिसरात बदनामी झाली. त्यामुळे गावातील लोक माझ्याकडे संशयाने बघत आहेत. माझी वनकुटे परिसरात नाचक्की झाली आहे. मला व माझ्या कुटुंबाला समाजात वावरणे मुश्किल झाले आहे. वास्तविक लोन नाकारताना जी कारणे दिली, त्यात धंद्यासंदर्भात काही कारण न देता माझ्या वैयक्तिक जीवनात डोकवण्याचा अधिकार थोरात यांना कुणी दिला, असे केदारी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 
बॅलन्सशीट चुकीचे दिले 
संतोष केदारी यांनी आम्हाला चुकीचे बॅलन्सशीट दिले. त्यानंतर त्यांच्या दुकानाची पाहणी केली असता व्यवसायाप्रमाणे त्यांना ५० हजारांचे कर्ज देण्यास बँक तयार होती. पण कर्ज मागणी जास्त असल्याने त्यांची चौकशी केली असता आम्हाला जी कारणे दिसली, ती देत त्यांचे कर्ज नाकारले.
- दत्ता थोरात, शाखाधिकारी, सेन्ट्रल बँक पळशी शाखा 

बातम्या आणखी आहेत...