आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार दिलीप गांधींच्या मध्यस्थीनंतर ठेकेदारांचे आंदोलन मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेतील ठेकेदारांनी २०१७-२०१८ या वर्षात केलेल्या विविध विकास कामांची थकलेली बिले अदा करावीत या मागणीसाठी महापालिकेसमोर सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी गुरुवारी मागे घेण्यात आले. खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत टप्प्याटप्प्याने बिले काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन   मागे घेण्यात आले. 


नगरसेवक स्वेच्छा निधी व इतर लेखाशीर्षाखाली सर्व देयके मिळण्यासाठी वारंवार चर्चा होऊनही बिले निघत नाहीत. ठेकेदारांचे चालू सुमारे २ कोटी ८५ लाखांची बिले थकली आहेत. त्यामुळे ठेकेदारांमधून संताप व्यक्त केला जात होता. प्रशासनातील कामकाज पद्धतीच्या दोषांमुळे ठेकेदारांवर आंदोलन करण्याची वेळ आली. थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी ठेकेदारांनी बुधवारपासून (२३ मे) महापालिकेसमोर उपोषण सुरू केले. आयुक्त पदाचा भार जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्याकडे असताना ठेकेदारांना आंदोलन करावे लागले. दुसऱ्या गुरुवारीही आंदोलन सुरूच होते. खासदार गांधी यांनी साडेचारच्या सुमारास आंदोलकांशी चर्चा केली. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ऊसाचा रस घेऊन आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर गांधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 


गांधी म्हणाले, आंदोलन करणारे सर्व लहान ठेकेदार आहेत. नगरसेवकांच्या सांगण्यावरून नगरसेवक निधीतून त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची बिले देणे आवश्यक आहे. िबले नियमीत दिली पाहिजेत कारण ठेकेदार सुविधेची विविध कामे करत असतात. थकबाकीच्या कारणास्तव सर्वच ठेकेदारांनी काम बंद केले, तर शहरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. आंदोलकांशी चर्चा करून उपोषण सोडवले, नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. टप्प्याटप्प्याने बिले अदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उद्यापासून काही बिलांचे धनादेश काढले जातील, असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...