आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! सरपंचाच्या पतीकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; कॉल रेकार्डिंग व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर/वाळकी- सोनेवाडी येथील सरपंचाच्या पतीने गावातील एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सुरेश चांदणे असे त्याचे नाव आहे. अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चांदणेसह त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चांदणेने केलेली शरीरसुखाची मागणी, तसेच अश्लील शिवीगाळीचे कॉल रेकार्डिंग व्हायरल झाले आहे. दारुच्या नशेत केलेली चूक अंगलट येत असल्याचे लक्षात येताच चांदणे याने पत्नीच्या नावाने गावातील एका गटाच्या विरोधात अॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. 


चांदणे व त्याचे मित्र नशेत असताना त्यांनी गावातील एका महिलेला फोन केला. संबंधित महिलेने फोन उचलताच चांदणेने शरीरसुखाची मागणी केली. पीडित महिलेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. हे संभाषण रेकॉर्ड झाले. या महिलेने ते गावातील काही प्रतिष्ठितांना ऐकवले. त्याचा राग मनात धरत चांदणे याने पत्नीच्या नावाने विरोधी गटाच्या विरोधात अॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. रहिवासी दाखला देत नाही, म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


नगर तालुका पोलिसांनी बाबासाहेब एकनाथ बेरड, सुभाष भगवान बेरड, निवृत्ती परशुराम बेरड, केशव भगवान बेरड, साहेबराव निवृत्ती बेरड, निवृत्ती पांडू बेरड, तुकाराम अर्जुन बेरड, गोरख किसन बेरड व संगीता साहेबराव बेरड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...