आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस आता फसणवीस झाले, धनंजय मुंडे यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - जाहिरातबाजी करत 'अच्छे दिना'चे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारला जनता त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे अध्यक्ष असताना देवेंद्र हे फडणवीस होते. आता ते थापा मारून जनतेला वेड्यात काढत असल्याने फसणवीस झाले अाहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली.

 

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन बाबासाहेब आंबेडकर मैदानात झाले. यावेळी मुंडे बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार अशोक काळे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार भाऊसाहेब चिंगटगावकर, आशुतोष काळे, पुष्पा काळे, चैताली काळे, जयदेव गायकवाड, संदीप वर्पे, दीपक साळुंके आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य, सरपंच, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खासदार सुळे म्हणाल्या, विकासाच्या नावाखाली जर हे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात त्यांच्या मर्जीव्यतिरिक्त घेत असेल, तर गाठ माझ्याशी आहे. मी एक इंच जमीन सरकारला घेऊ देणार नाही. आव्हाड म्हणाले, जातीय तेढ निर्माण करून भीमा कोरेगावातील दंगलीची हे सरकार पाठराखण करत आहे. हा प्रकार घडवणारे मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांना २५ तारखेपर्यंत अटक झाली नाही, तर २६ पासून चालू होणारे अधिवेशन एक दिवसही चालू देणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...