आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी अामदार जयंत ससाणे यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (६०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते श्रीरामपूर मतदारसंघाचे दोन वेळा आमदार, तर श्रीरामपूरचे दहा वर्षे नगराध्यक्ष होते. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले हाेते. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


त्यांच्या पश्चात मुलगा करण, पत्नी राजश्री, सून दीपाली, नात, बंधू सुनील, भावजय असा परिवार आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ससाणे यांनी प्रस्थापितांशी राजकीय संघर्ष  करत राजकारणात आपले स्थान निर्माण केले. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी काही नगरसेवक एकत्र करून श्रीरामपूर पालिकेत सत्तांतर घडवून आणले. त्यांच्या कारकीर्दीत नगरपालिकेला संत गाडगेबाबा अभियानाचा पुरस्कार चार वेळा मिळाला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...