आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आष्टीमध्ये आग भडकून फटाका गोदामात स्फोट; एकाच कुटुंबातील तिघे ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी- फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर स्फोटामुळे एक मजली इमारतीच्या स्लॅबची भिंत कोसळली. यात दबून एकाच कुटुंबातील मायलेकासह भाचा असे ३ जण ठार झाले. आष्टी शहरातील दारुगल्ली भागात शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. सर्फराज अल्लाउद्दीन सय्यद (३८ दारुगल्ली, आष्टी), फरजाना उल्लाउद्दीन सय्यद (६०), फैजल सय्यद (१४, नगर) अशी मृतांची नावे आहेत. 


फटाका विक्रेता सर्फराज यांच्या घरातच फटाका गोदाम आहे. तेथे अचानक आग लागली व नंतर मोठा स्फोटही झाला. यामुळे स्लॅब कोसळला. आग विझविताना आधी सर्फराज, स्लॅब तोडताना आई फरजाना यांचे मृतदेह सापडले. यानंतर सर्फराज याचा भाचा फैजल याचाही मृतदेह सापडला. 

 

तासभर फुटत राहिले फटाके 
आगीनंतर एक तास गोदामातील फटाके फुटत होते. लोकांनी भांड्याने पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला. जामखेड येथून नगरपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब सायंकाळी पावणेसहा वाजता पोहचला. मात्र तोवर आग विझली होती. 


एकाच कुटुंबातील तिघे ठार 
दारू गल्लीत सहा गोदामे दारू गल्लीत शाेभेच्या दारूची विक्री केली जाते. येथे सहा गोदामे आहेत. येथे मातीचे भुईनळे तयार केले जातात. येथे तेरखेडा, शिवकाशीहून फटाके आणून वर्षभर साठा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...