आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याचे पर्याय निर्माण केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोेपरगाव- छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांच्या भरवशावर न राहाता हिंदवी स्वराज्याचा पाया घातला, म्हणूनच त्यांचे सुराज्य कधी कोसळले नाही, असे सांगत जगण्याचे पर्याय जेव्हा आपण स्वतः निर्माण करू तेव्हा या देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे यांनी केले. 


संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांनी प्रा. बानुगडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रास्ताविकात कोल्हे म्हणाले, प्रतिष्ठानने आजवर गोरगरीब, मागासवर्गीय रूग्णांसाठी सामाजिक उपक्रम राबवले. यावर्षी शिवनेरीवर स्वच्छता अभियान राबवले, तसेच वृक्षारोपणही केले. याप्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे उपस्थित होते. 


प्रा. बानुगडे म्हणाले, ज्याचा मनात पराभव होतो, तो रणात कधीही जिंकू शकत नाही. राज्य उभे करणे सोपे आहे, पण ते टिकवणे अवघड आहे. जुलूम, अत्याचार, अन्याय यापासून रयतेची सुटका करून त्यांच्या पोटाला काम मिळेल, अशी व्यवस्था शिवबाने निर्माण केली. प्रत्येक प्रांतात त्यांनी कर्तृत्व गाजवले. राज्य राखीव दलाची संकल्पनाही त्यांनीच सर्वप्रथम सुरू केली. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती होते. याप्रसंगी बालकलाकार संकेत गाडे, पियूष लोखंडे, अक्षय ठोंबरे, ऊर्जा चंद्रकांत निर्मळ यांनी हिंदवी स्वराज्याचे किस्से ऐकवले. सचिन शिल्लक, शाहीर शिवराज यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमासाठी बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. 


योगतज्ज्ञ नितीन घायवट यांनी यावेळी योग प्रात्याक्षिके सादर केली. संदीप जाधव यांनी शिवबाची गाणी व पोवाडे सादर केले. 

बातम्या आणखी आहेत...