आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकन विक्रेत्यांमध्ये राहुरीत तुंबळ मारामारी; ७-८ जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- चिकनच्या कमी-जास्त होणाऱ्या दरावरून, तसेच कामगाराला दिलेल्या उचलीच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भाईभाई व दिलखुश या चिकन विक्रेत्यांमध्ये तुंबळ मारामारी झाली. यात ७-८ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहुरी बसस्थानकासमोर ही घटना घडली. 


दोन्ही गटांतील हल्लेखोरांनी कोयते, लाकडी दांडे व एकमेकांवर दगडफेक केल्याने नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक तब्बल तासभर ठप्प झाली. मारामारी करणाऱ्यांची संख्या ५०० च्या पुढे होती. मारहाणीत कोयते, लाकडी दांडे व दगडांचा वापर करण्यात आल्याने तणाव वाढला. या राड्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने लगेट बंद केली. शहरातील राज्यमार्गावर दहशत निर्माण करण्याची राहुरीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच दोन्ही गटांतील हल्लेखोर पसार झाले. जखमींना उपचारासाठी नगर येथील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...