आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या नांदण्यावरून वाद; तिरमली समाजाच्या दोन गटांत तुंबळ मारामारी, ३५ जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- श्रीगोंदे कारखाना परिसरातील जोशी वस्ती येथील तिरमली समाजाच्या दोन गटांत बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुंबळ मारामारी झाली. गज, काठ्या, तलवारी, कोयते व लाकडी दांडक्यांचा वापर केला गेला. या घटनेत तीस ते पस्तीस जण गंभीर जखमी झाले. पाच ते सात जण अत्यवस्थ असल्याने त्यांना दौंड व नगर येथील रुग्णालयांत पाठवण्यात आले आहेत. जातपंचायतीचा निर्णय आणि एका मुलीच्या नांदण्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर या मारामारीत झाले. 


जातपंचायतीच्या निर्णयामुळे काही कुटुंबांना जातीतून बाहेर काढण्यात आल्याचे हे प्रकरण राज्यभर गाजले. ज्या कुटुंबांना जातीतून बाहेर टाकले, ती कुटुंबे न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास काही पंच आणि महिला, पुरुष एका कुटुंबातील मुलीच्या नांदण्याबाबत तडजोड करण्यासाठी एकत्र आले होते. मागील वाद आणि एका तरुणाने मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याने संघर्षाची ठिणगी पडली. दोन गटांत मारामारीला सुरुवात झाली. काही पंच बाहेरगावांहून आले होते. त्यांनाही स्थानिकांनी बेदम मारहाण केली. अनेकांची डोकी फुटली. अंगाखांद्यावर जखमा झाल्या. महिला बेशुद्ध पडल्या. 


पोलिसांचा निष्काळजीपणा 
तिरमली जातीतील निर्णयासाठी धामणगाव परिसरातून काही पंच आले होते. या समाजातील काही तरुणांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांना दुपारी फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता, तर हे प्रकरण वाढले नसते. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकरण वाढल्याचे संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सांगितले . 

बातम्या आणखी आहेत...