आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलापूर-श्रीरामपूर मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, 5 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ काल (बुधवार) रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


मृतांमध्ये नितीन सोनवणे (वय- 27), शिवा ढोकचौळे (वय- 27, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय-28), भारत मापारी (वय- 27, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय- 30, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. तर पियुष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.

 

हे सर्व स्विफ्ट कारमधून (एमएच 17, एसी 9009) वाढदिवसाच्या पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पलट्या घेत समोरुन येणा-या टँकरवर (एमएच 04, आर 9666) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच 17, 6055) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...