आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फलकाच्या वादातून जामखेडचे हत्याकांड, चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळीबारात मृत्‍यूमुखी पडलेले राकेश राळेभात व योगेश राळेभात. - Divya Marathi
गोळीबारात मृत्‍यूमुखी पडलेले राकेश राळेभात व योगेश राळेभात.

जामखेड- जामखेडमधील राष्ट्रवादीच्या दाेन कार्यकर्त्यांच्या  हत्येप्रकरणी रविवारी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आला असून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अारोपींच्या शोधासाठी १५ पोलिस पथके रवाना झाली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ जामखेड शहरात बंद पाळण्यात आला. योगेश अंबादास राळेभात (३०) व राकेश अर्जुन राळेभात (२५, मोरेवस्ती) यांची शनिवारी सायंकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात अाली हाेती.

 

या प्रकरणी योगेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन  गोविंद दत्ता गायकवाड (तेलंगशी, जामखेड) याच्यासह ४ ते ५ जणांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला. मृत युवकांचे वर्षभरापूर्वी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांशी भांडण झाले होते. राजकीय फलक लावल्याच्या कारणावरून हा वाद उद‌्भवला हाेता. त्याचाच राग मनात धरुन  गाेविंद गायकवाड व इतर ४ ते ५ जणांनी योगेश व राकेशला गोळ्या घातल्या असल्याचे याेगेशचा भाऊ कृष्णाने फिर्यादीत म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...