आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद ; म्होरक्या फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. आरोपींकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात अाला. नगर-औरंगाबाद रस्त्यावर मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, टोळीचा म्होरक्या व शिर्डीतील कुख्यात गुंड प्रदीप सुनील सरोदे (शिर्डी) अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वर्षभरापूर्वी सरोदे याला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून तीन गावठी कट्टे जप्त केले होते. त्या कारवाईमुळे राहुरीतील संभाव्य टोळीयुध्द टळले होते. 


बिपीन रावसाहेब पवार (लक्ष्मीनगर, शिर्डी), महेश रामकरण विश्वकर्मा (नॉर्दन ब्रँच, श्रीरामपूर), िनरंजन तुकाराम थोरात (शिर्डी), आरिफ युनूस शेख (विरार इस्टेट, ठाणे), गोरक्ष नवनाथ कांबळे (हनुमाननगर, कोपरगाव), राहुल लक्ष्मण बंदिवान (नेवासे), मोसीन फिरोज शेख (सुभेदार वस्ती, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या अारोपींची नावे आहेत. प्रदीप सुनील सरोदे (शिर्डी) व लखन प्रकाश माखिजा (श्रीरामपूर) हे दोघे आरोपी फरार झाले आहेत. 


औरंगाबाद रस्त्यावर सात-आठ जण दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. पवार यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलिसांची गाडी पाहताच आरोपींनी धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत सात आरोपींना ताब्यात घेतले. दोघे मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, तीन धारदार सत्तूर, मिरची पावडर, आठ मोबाइल, दोन मोटारसाकली असा पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला. 


पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील, उमेश खेडकर, मन्सूर सय्यद, फकीर शेख, विजय ठाेंबरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे आदींनी ही कामगिरी केली. 


पाप्या शेखवर केला होता हल्ला 
आरोपी प्रदीप सरोदे हा शिर्डीतील कुख्यात गँगस्टर आहे. शिर्डीतील तत्कालीन कुख्यात गुन्हेगार पाप्या शेख याच्यावर सरोदेच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. मात्र, त्यातून पाप्या शेख बचावला. तेव्हापासून सरोदेची टोळी प्रकाशझोतात आली. नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकानेही सरोदेला आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात अटक केली आहे. जिल्ह्याच्या उत्तरेत त्याच्या टोळीचा मोठा दबदबा आहे. 

बातम्या आणखी आहेत...