आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर हत्याकांडामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द मात्र पालकमंत्री पोहोचले थीम पार्कच्या उद्घाटनाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर/शिर्डी- नगरमध्ये शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची राजकीय वादातून शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण असूनशिवसेनेने कडकडीत बंद पाळला आहे. यामुळेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आलेला आहे. पण संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदेनीं मात्र एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत.


एकीकडे, कायदा सुव्यवस्थेचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला होता. राज्यातील मंत्री अहमदनगरला येत असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र कौतुक सोहळ्यात व्यस्त असल्याने चीड व्यक्त केली जात आहे.

राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी नगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. शिवसेनेने नगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते.

 

आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत दोन्ही शिवसैनिकांच्या पार्थिवाचे अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं.

बातम्या आणखी आहेत...