आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळ वा-यामुळे शिर्डी विमानतळाचे मोठे नुकसान, वा-याने रनवेवरील विमानाची दिशा बदलली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे शिर्डी विमानतळाचे शुक्रवारी मोठे नुकसान झाले. विमानतळाच्या अरायव्हल एन्ट्री गेटजवळील टर्मिनलमधील काचेची वाॅल (पार्टिशन) उद््ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की विमानतळावर उभे असलेल्या एका छोट्या विमानाची दिशाच बदलून केले. सुदैवाने विमानात एकही प्रवासी नव्हता. विमानाचे काहीही नुकसान झाले नाही. हे विमान अहमदाबादहून आले होते. 

 

शक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगमध्ये काचेची वाॅल व फर्निचर वाऱ्यामुळे उद््ध्वस्त झाले. यामुळे विमानतळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खराब वातावरणामुळे हैदराबादहून येणारे सायंकाळचे विमान रद्द करण्यात आले. हवामान चांगले असल्यास शनिवारपासून उड्डाणे नियमित सुरू राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
 
खराब हवामानामुळे हैद्राबादहून आलेले विमान माघारी
शिर्डी विमानतळ परिसरात वादळी वाऱ्याच्या तडाखा सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास हैदराबादहून आलेले एअर अलायन्सचे विमान लँडिंगसाठी घिरट्या घालू लागले. अशा वातावरण विमान उतरवणे धोकादायक असल्याने मात्र एटीसीने त्याला सिग्नल दिला नाही. यामुळे हे 65 प्रवासी असलेले हे विमान औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र तेथेही खराब हवामान असल्याने लँडिंग होऊ शकले नाही. अखेर हे विमान परत हैदराबादला परत गेले. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसाेय झाली. तथापी विमान कंपनीने या प्रवाशांचे पैसे परत केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...