आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय परिषदेत बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांचा सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नुकत्याच मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक विकास वर्तनसमस्या बालरोग परिषदेत नगरचे प्रसिद्ध बाल पौगंडावस्था तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांना तीन संशोधनात्मक पेपर्स संशोधन पेपर्ससाठी परीक्षक असा सन्मान मिळाला, तसेच पुढील दोन वर्षांत वाढ विकास याबद्दल जगभर मान्य होईल असा कार्यक्रम बनवणे, मार्गदर्शक म्हणून नवीन संशोधकांना मार्गदर्शन करणाऱ्या जागतिक समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे. ७० देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतलेल्या या परिषदेस ५५० डॉक्टर, संशोधक, थेरेपिस्ट, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यएचओ) प्रतिनिधी उपस्थित होते . 


या परिषदेत संशोधन तोंडी मांडण्यासाठी जगातून निवडक पन्नास डॉक्टरांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात डॉ. तांबोळी यांचा समावेश होता. त्यांनी पाचशे रुग्णांचा अभ्यास करून समाजात स्क्रिनिंग चाचणीद्वारे उशिरा वाढ ओळखणे, हे सखोल चाचणी करण्यासारखेच शक्य आहे, यावर आपले संशोधन मांडले. या संशोधनाला परीक्षक डॉ. मेलेसा ग्लडस्टोन (इंग्लंड), डॉ. सालेहा (सौदी अरेबिया) यांनी (एक्सलंट) अप्रतिम संशोधन असे संबोधले. या संशोधनामुळे समाजात जागृती होऊन वाढ विकासाला उशीर होणारी मुलांचे लवकर निदान करून उपचार करता येतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या मध्ये डेनव्हर चाचणी द्वारे दहा मिनिटांत स्नायूविकास, भाषाविकास, सामाजिक विकास आदी क्षेत्रांत सखोल निदान होऊ शकते हे सिद्ध केले. 


या परिषदेत डॉ. तांबोळी यांचे दोन पोस्टर्स संशोधन पण मान्य करण्यात आले. त्यांनी जन्मत: मुलांना बौद्धिक विकास कार्यक्रम दिला, तर त्यांच्यातील दोष ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात असे संशोधन मांडले. ऑस्ट्रेलियातील डॉ. राजीव शहा यांनी या संशोधनाच्या पद्धतीचे उपयोगात्मक बौद्धिक विकास कार्यक्रमाचे कौतुक केले.


डॉ. तांबोळी यांना संशोधनपर पेपर्सचे परीक्षण करण्यासाठी डॉ. गरी ग्रँड यांच्याबरोबर संधी मिळाली. परीक्षक या नात्याने त्यांनी नवीन संशोधकांना त्यांच्या संशोधनात बदल करण्याबद्दल मार्गदर्शन केले. या परिषदेचे आयोजन उम्मीद परिवार मुंबई येथील डॉ. विभा कृष्णमूर्ती यांनी केले होते. स्वकेंद्रित मुले, वाढीच्या समस्या, अस्थिरता, बौद्धिक विकास कार्यक्रम पालकांचा सहभाग इ. विषयांवर परिषदेत चर्चा झाली. 


या शिवाय नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत डॉ. तांबोळी यांनी जन्मत: ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलांचे झोपेचे आजार यावर मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या झोपेच्या आजारांवर उपचार करणारे पुणे, नाशिकनंतरचे नगर मराठवाडा भागात पहिले उपचार केंद्र जानेवारी अखेरपासून सुरु होणार अाहे. त्यात झोपेत चालणे, बोलणे, झोप येणे, घोरणे आदी आजारांवर मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. तांबोळी यांनी सांगितले. 


नुकत्याच मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक विकास वर्तनसमस्या बालरोग परिषदेत नगरचे प्रसिद्ध बाल पौगंडावस्था तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांना तीन संशोधनात्मक पेपर्स संशोधन पेपर्ससाठी परीक्षक असा सन्मान मिळाला. 

बातम्या आणखी आहेत...