आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत सदोष ‘लँडिंग’नंतर लगेचच ‘टेक ऑफ’च्या प्रयत्नामुळे घसरले विमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 शिर्डी - शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवरून  सोमवारी विमान घसरल्याच्या घटनेची चाैकशी करण्यासाठी  नागरी उड्डाण महासंचालनालयाचे दाेन अधिकारी साेमवारी रात्रीच दाखल झाले.   लँडिंग चुकीचे होत असल्याची सूचना एटीसीने वैमानिकाला दिल्यानंतरही त्याने विमान जागेवरच न थांबवता पुन्हा ‘टेक ऑफ’ करण्याचा प्रयत्न केल्यानेच विमान घसरल्याची माहिती सूत्रांनी  दिली. 


दरम्यान, मंगळवारी मुंबईहून आलेल्या विमानाचे सायंकाळी पाच वाजेदरम्यान सुरक्षित लँडिंग झाले. या विमानाने नंतर मुंबईकडे उ्डडाणही केले. बुधवारपासून हैदराबाद आणि मुंबईची सेवा पूर्ववत होईल.  दरम्यान, पथकातील अधिकारी गोपनीय अहवाल उड्डाण मंत्रालयाला पाठवणार आहेत, अशी माहिती विमानतळाचे संचालक धीरेन भोसले यांनी दिली.   


मुंबईहून आलेले एअर अलाएन्सचे विमान शिर्डी विमानतळावर घसरल्याच्या घटनेचा जगदीश आणि पनिक या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकाने पंचनामा केला. विमान प्रथम ‘लंॅड’ झाले तेथील खुणा तपासण्यात आल्यानंतर पथकाने वैमानिकाची चौकशी केली.  अपघातग्रस्त विमानाला दुपारी ट्रॅक्टरच्या साह्याने धावपट्टीवर आणून  पार्किंगला लावण्यात आले. विमानाचे नुकसान झाले नसले तरी ते वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र उड्डाण विभागाकडून मिळाल्यानंतरच ते अनुभवी वैमानिकाच्या ताब्यात देण्यात येईल.

 

मुरुमात फसल्याने माेठा अपघात टळला    
एटीसीने वैमानिकाला चुकीचे लँडिंग होत असल्याचा संदेश दिला. हे कळताच वैमानिकाने पुन्हा ‘टेक ऑफ’चा प्रयत्न केला. अशातच वेग घेताना धावपट्टी संपली व विमान थेट पुढे असलेल्या राखीव कच्च्या धावपट्टीवर १०० फूट जाऊन मुरुमात फसले. सुदैवाने तेथे विमानावर नियंत्रण मिळवण्यात पायलटला यश मिळाल्याने अनर्थ टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...