आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विभागात नगर तिसऱ्या क्रमांकावर, पुन्हा मुलींनीच मारली बाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्याचा बारावीचा निकाल एका टक्क्याने कमी झाला असताना त्याचा परिणाम पुणे विभागीय मंडळावरही झाला आहे. यंदा पुणे विभागाचा निकाल ८९.५८ टक्के लागला असून त्यात नगर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नगर जिल्ह्याचा निकाल ८९.२५ टक्के लागला. जिल्ह्यातील ६२ हजार १४१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ५५ हजार ४६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

 

पुणे विभागात पुण्यासह सोलापूर आणि नगर जिल्ह्याचा समावेश होतो. या वर्षी पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ७४७ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख १० हजार ९६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त होते. यंदा मात्र या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातील ४ हजार ५०१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, तर २५ हजार २०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदा जिल्ह्यातील एकाही तालुक्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक मुले उत्तीर्ण झालेले नाहीत. या उलट उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सर्वाधिक निकाल राहुरी तालुक्याचा लागला.

 


जिल्ह्यातील १६ विद्यालये शंभर नंबरी
सनफार्मा विद्यालय (नागापूर), ज्ञानसरिता विद्यालय (वडगाव गुप्ता), समर्थ विद्यामंदिर (सावेडी), वर्का कॉलेज (अरणगाव), रामकृष्ण कॉलेज (नगर), अशोकभाऊ फिरोदिया (नगर), मदर तेरेसा (मुकुंदनगर), पी. ए. इनामदार (गोविंदपुरा), ऑक्झिलियम (सावेडी), प्रियदर्शनी ज्युनिअर कॉलेज (पाथर्डी), पदमभूषण विखे, एफटर्स ज्युनिअर कॉलेज (धनगरवाडी), अंबिका विद्यालय (केडगाव), छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज, नवभारत विद्यालय, इन्फॉर्मेशन टेक्निकल कॉलेज

 

बातम्या आणखी आहेत...