आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांबद्दल अपशब्द काढणार्‍या छिंदमचे नगरसेवकपद रद्दचा ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द करून त्याच्यावर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचा ठराव साेमवारी भाजपसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत मांडला. महापौर सुरेखा कदम यांनी ठरावास मंजुरी देऊन पुढील कार्यवाहीसाठी ताे सरकारकडे पाठवण्यात अाला.


छिंदमसारख्या विकृत माणसाला नगरमध्ये राहू देणार नाही. सर्वच महापुरुष या देशाचे दैवत आहे. त्यामुळे सर्वांनी तारतम्य बाळगून बोला, असे सभागृहनेता उमेश कवडे म्हणाले. छिंदमच्या वागण्याने सर्वांचीच मान शरमेने खाली गेली. तो संघाशी संबंधित नव्हता. एखाद्या कार्यक्रमात संघाचा गणवेश घातला म्हणजे तो संघाचा होत नाही. त्याचे नगरसेवकपद रद्द करावे, असे भाजपचे गटनेते दत्ता कावरे म्हणाले, तर  वाकळे यांंनीही छिंदम व भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर

महापौरांनी सर्वांती संमती असलेल्या छिंदम यांच्या नगरसेवकपद रद्द करण्याच्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याला भाजप गटनेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिले.

 

महापालिकेचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी संवाद साधताना छिंदम याने छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. ऑडियो क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. नंतर संपूर्ण महाराष्‍ट्रात‍ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चौफेर टीका होत असल्याचे पाहून छिंदम याने जाहीर माफी माग‍ितली होती.

 

उपमहापौरपदावरून  बडतर्फ

श्रीपाद छिंदम याला तडकाफडकी उपमहापौरपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच भाजपने ही त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. दरम्यान, याआधी छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा ठराव 22 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...