आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे बाेरुडे; काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या उमेदवारांची ऐनवेळी माघार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे उपमहापाैरपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या श्रीपाद छिंदम याच्या रिक्त जागेवर साेमवारी शिवसेनेचे अनिल बाेरुडे यांची बिनविराेध निवड झाली. महापाैरपद शिवसेनेकडे असताना उपमहापाैरपदाचा मान मिळण्याची पक्षाला नगर महापालिकेत प्रथमच संधी मिळाली. महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना हा विजय शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आहे.    


छिंदमच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपचे नाचक्की झाली अाहे. त्याचे प्रायश्चित्त म्हणून या पक्षाने उपमहापाैर निवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता.  तसेच मतदानापासूनही दूर राहण्याची भूमिका घेतली हाेती. काँग्रेसचे मुदस्सर शेख, मनसेच्या वीणा बोज्जा, राष्ट्रवादीचे विपुल शेटिया, आरिफ शेख, शिवसेनेकडून अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, समद खान यांनी अर्ज दाखल केले होते. साेमवारी  सकाळी ११ वाजता  पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभय महाजन दाखल झाले. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. बोरुडे वगळता इतर उमेदवारांनी माघार घेतली.

 

अापणच ताेंडाला काळे फासून घेऊ : कावरे  
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधींनी प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. खरे तर हा निर्णय मतदानावर बहिष्कार घालून घ्यायला नको होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे आपली युती नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. पण प्रायश्चित्तच घ्यायचे असेल तर मी स्वत: येतो, आपण तोंडाला काळे फासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसू, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांनी दिली. यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली.

 

प्रायश्चित्य म्हणून भाजपची माघार..

भाजपने प्रायश्चित्य म्हणून आधीच निवडणुकीतून माघार घेतली आहे.  त्यात मनसे व बंडखोर गटानेही शिवसेनेशी झालेल्या चर्चेनंतर माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने अनिल बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला होता.

 

घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीची माघार...

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीने सकाळीच पत्रकार परिषद घेवून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.

बातम्या आणखी आहेत...