आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केडगाव दुहेरी हत्याकांड: काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकरला अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी आज (मंगळवार) पहाटे कामरगाव येथून अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचाही समावेश आहे.

 

केडगाव येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या संदीप गुंजाळ याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान संदीपने सांगितले की विशाल कोतकरच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडवून आणण्यात आले आहे. संदीपने ही माहिती दिल्यापासून पोलिस विशाल कोतकरच्या मागावर होते. अखेर त्याला मंगळवारी पहाटेच्या सुमारास नगर तालुक्यातील कामरगावमधून अटक करण्यात आली.

 

गुंजाळ हा हत्या झाल्याच्या दिवशी पारनेर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला होता त्याने त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांकडे जमा केले होते. पोलिस तपासात त्याने हत्याकांडात सहभागी असलेल्या सगळ्यांची नावे सांगितली होती.

बातम्या आणखी आहेत...