आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह तब्बल 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह शहरप्रमुख, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह तब्बल 600 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हत्याकांडानंतर दगडफेक, रस्ता रोको, शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा, मृतदेहाची अवहेलना यासह अनेक गंभीर गुन्हे शिवसैनिकांवर दाखल केले आहेत.

 

दाेन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे अामदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर पाेलिस अधीक्षक कार्यालयाची ताेडफाेड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले भाजपचे अामदार शिवाजी कर्डिले साेमवारी स्वत:हून पाेलिसांत हजर झाले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मंगळवारी या प्रकरणात त्यांना जामीन मिळालाच, तर दुहेरी हत्या प्रकरणात पोलिस त्यांना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता आहे.  


दरम्यान, शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी ‘एसअायटी’ची स्थापना करण्यात अाल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. या खून प्रकरणात राष्ट्रवादीचे अामदार संग्राम जगताप, अामदार अरुण जगताप व भाजप अामदार कर्डिले यांच्यावर गुन्हा दाखल अाहे. या प्रकरणी संग्राम हे १२ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडीत अाहेत. तर फरार असलेले कर्डिले साेमवारी स्वत:हून पाेलिसांसमाेर हजर झाले.  अाता अामदार अरुण जगताप यांच्यावर केव्हा कारवाई हाेते याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.


एसआयटीमार्फत तपास : दुहेरी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आल्याची माहिती  पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. श्रीरामपूरचे अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार हे या पथकाचे प्रमुख आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार हे गुन्ह्याचा तपास करणार आहेत. सहायक अधीक्षक मनीष कलवानिया, सायबर क्राईमचे निरीक्षक सुनील पवार, तोफखाना ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांचाही या पथकात समावेश आहे.


मुख्यमंत्र्यांना भेटणार : वळसे
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी साेमवारी नगरमध्ये येऊन पक्षाची बाजू मांडली. ते म्हणाले, हत्याकांडातील आरोपीने स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. असे असतानाही शिवसेनेने सत्तेचा वापर करत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना अडकवले. ज्या तरुणाने पोलिस अधीक्षक कार्यालयाची काच फोडली, त्याचा शोध न घेता पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेने आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कारवाईला तयार रहावे. याप्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह अापण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अाहाेत.’

 

‘अाराेपी’ अामदारांचा पवार, विखेंना कळवळा
केडगावातील दाेन शिवसैनिकांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादीच्या दाेन व भाजपच्या एका अामदारावर गुन्हे दाखल अाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व  काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र या अामदारांची पाठराखण केली. ‘संग्राम जगताप यांचा या हत्याकांडाशी संबंध नसून, त्यांना गाेवण्यात येत अाहे. राष्ट्रवादीच्या बदनामीचे हे षड््यंत्र अाहे,’ असा दावाही पवारांनी केला.  तर विधानसभेचे विराेधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, ‘खुनाच्या अाराेपावरून आमदारांना थेट अटक करणे बरोबर नाही. ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे प्रथम प्रकरणाची चौकशी करायला हवी हाेती.’

बातम्या आणखी आहेत...