आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी, तान्ह्या मुलीची निर्घृण हत्या; सासूलाही ठार मारण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी व मुलीला ठार, तर सासूला जखमी केल्याची घटना खडकीत मंगळवारी घडली. नंतर पोलिस ठाण्यात आरोपी हजर झाला.


गणेश भीमराव खरात (३० वर्षे) याने पत्नी सुकेशिनी (२१) हिच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिला  ठार केले. नंतर मुलगी सोनिया ऊर्फ दीदी या तीन महिन्यांच्या मुलीच्या मानेवर कुऱ्हाड चालवून तिला यमसदनी पाठवले. सासू रुक्मिणी सुभाष गवई (४८, चिखली, जिल्हा बुलढाणा) यांच्या डोक्यातही त्यांनी कुऱ्हाडीचे घाव घातले. त्या  गंभीर जखमी झाल्या. गणेशने सकाळी ७.३० वाजता कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. जखमी रुक्मिणी सुभाष गवई यांनी पोलिसांना दिलेली फिर्यादीत म्हटले आहे, माझी मुलगी सुकेशिनी व गणेश यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला. एक वर्षापासून गणेश पत्नीला त्रास द्यायचा. तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाल्यावर त्याच्या पत्नीने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्याचा राग येऊन गणेश पत्नीला वारंवार त्रास द्यायचा. त्याला समजावून सांगण्यासाठी व मुलीला काही दिवस माहेरी नेण्यासाठी रुक्मिणी खडकी येथे आल्या होत्या. सकाळी साडेसात वाजता त्या चहा घेत असताना गणेशने मागून येऊन त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. हे पाहून गणेशच्या आईने आरडाओरडा केला. गणेशने त्याआधीच आपल्या मुलीसह पत्नीलाही ठार केले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...