आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक/नगर- संगमनेर तालुक्यातील घारगावसह परिसरात मंगळवारी (दि. २१) भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ८.३३ वाजता भूकंपाचे सलग सहा सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापन केंद्रात नोंदवले गेल्याचे संस्थेचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पठार भागातील घारगाव, बोरबन, कुरकुंडी आणि आंबी खालसा या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातील भांडी खाली पडली. नागरिक घराबाहेर रस्त्यावर आले. यापूर्वी १८ ऑगस्टला या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारासही घारगाव व परिसरातील काही गावांमध्ये भूगर्भातील हालचालींचे सौम्य धक्के जाणवले होते. या धक्क्यांची कोणत्याही प्रकारची नोंद नाशिकच्या भूकंपमापन यंत्रावर झाली नव्हती. दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजल्यानंतर ठरावीक वेळेच्या अंतराने दोन धक्के घारगाव, आंबी खालसा, नांदूर खंदरमाळ, अकलापूर, कोठे, माळेगाव पठार, तांगडी, जांबूत या गावांमध्ये जाणवले. धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण होऊन ते घराबाहेर पडले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.