Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Illegal Slaughter house In Ahmednagar

नगरमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने..संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या दारात ओतला ट्रॉलीभर जैव कचरा

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 01:12 PM IST

शहरातील बेकायदेशीर कत्तल खाण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचा उदासीन कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आला.

  • Illegal Slaughter house In Ahmednagar

    नगर- शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचा उदासीन कारभार गुरुवारी चव्हाट्यावर आला. अनधिकृत कत्तलखान्यातील जैव कचरा व मृत प्राण्यांचे अवशेष भरून बुरुडगाव येथील कचरा डेपोच्या दिशेने निघालेला ट्रॅक्टर संतप्त ग्रामस्थांनी अडवून रात्री आठच्या सुमारास महापालिकेत आणून ओतला. ट्रॉलीभर कचरा मनपात फेकल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली.


    बेकायदेशीर कत्तलखाने शहरात राजरोसपणे सुरू असून ड्रेनेजलाइन प्राण्यांच्या अवशेषांमुळे तुंबत असल्याचा विषय काही दिवसांपूर्वीच 'दिव्य मराठी'ने निदर्शनास आणून दिला होता. त्यावेळी प्रशासनाने यापूर्वी कत्तलखाने सील केल्याच्या जुन्याच कारवाईची आठवण करून दिली होती. शहरात राजरोस प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल सुरू असून जैव कचरा कोणतीही विशेष काळजी न घेता फेकला जात आहे.


    गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुरुडगावच्या दिशेने शहरातील एक ट्रॅक्टर ट्रॉलीभर मृत प्राण्यांचा जैव कचरा घेऊन येताना नागरिकांना दिसले. एक किलोमीटर अंतरापासून रस्त्यावरच ट्रॉलीतील अवशेष गळत होते. ग्रामस्थांनी ट्रॅक्टर अडवून हा कचरा उचलून घेण्यास सांगत मनपा प्रशासनालाही कळवले. परंतु सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास थेट महापालिकेत आणून ट्रॉलीभर जैव कचरा ओतला.


    हप्तेखोरीमुळे होतात कत्तली
    शहरात महापालिकेचा अधिकृत कत्तलखाना नाही. बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली जाते. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. या प्रकारामागे 'हप्तेखोरी' बोकाळली असल्याची जोरदार टीका नगरमधील नागरिकांनी केली आहे.

Trending