आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये नेप्ती नाका चौकात कार पेटवली..पुणे महामार्गावर रास्ता रोको, विखे पाटीलही उतरले रस्त्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- दिवसभर शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. शहरातील नेप्ती नाका चौकात कार पेटवण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगर-पुणे महामार्गावर ठिय्या मांडला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

 

या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन शांततेत शिस्तबद्धपणे सुरू आहे. ठिय्या आंदोलनाच्या आधी चौकात राष्ट्रगीत झाले. एसटी महामंडळाच्या बस बंद आहेत. तसेच शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...