आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत- पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील परदेशात पळून गेलेला आरोपी नीरव मोदी याच्या मालकीची खंडाळा (ता. कर्जत) शिवारातील २२५ एकर जमीन अॅड. कारभारी गवळी आणि अॅड. कैलाश शेवाळेे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी ताब्यात घेतली. हे शेतकरी सहकुटुंब ‘काळी आई मुक्तिसंग्राम’चे फलक हाती घेत दाखल झाले होते. विशेष म्हणजे ईडीने ही जमीन सील केलेली आहे.
नीरव मोदी व सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना संबंधित जमिनीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यावर नोकरी देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन अल्पदरात जमीन खरेदी केली होती, असा शेतकऱ्यांचा दावा आहे. शनिवारी दुपारी ११ वाजता शेतकऱ्यांनी ‘काळी आई मुक्तिसंग्राम’ अशा नावाचे फलक हातात घेत सवाद्य मिरावणुकीने नीरव मोदी आणि फायरस्टोन कंपनीच्या नावे असलेल्या शेतजमिनीत प्रवेश करत ताबा मिळवला. या वेळी महिला शेतकऱ्यांनी तर फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. या शेतजमिनीमध्ये पीक घेण्याच्या विचारात शेतकरी आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेती करणार...
शेतकर्यांनी जमीन ताब्यात घेऊन ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरण्यात आली आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेली जमीन गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेती करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.