आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर विमान घसरल्याचे वृत्त निघाले FAKE; अशी घटना घडलीच नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर सोमवारी दुपारी एक विमान घसरल्याचे वृत्त झळकले. विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट संरक्षण कुंपनाला अडकले, त्यामुळे मोठी हानी टळली, असेही वृत्तात म्हटले होते. विशेष म्हणजे वृत्तासोबत कुंपनावर अडकलेल्या विमानाचे छायाचित्रही देण्यात आले होते. मात्र, हे वृत्त फेक निघाले.

 

या वृत्ताबाबत 'दिव्य मराठी डॉट कॉम'ने प्रतिनिधीशी संवाद साधला असता अशी कोणतीही घटना शि‍र्डी विमानतळावर घडलेली नसल्याचे समोर आले. वाचकांची शिर्डीत विमान घसरल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अशा फेक न्यूज पस‍लविल्या जात आहेत, त्यावरही विश्वास ठेवू  नये. असे आम्ही आवाहन करत आहे.

बातम्या आणखी आहेत...