आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या संगनमताने हत्या:मंत्री कदम; भाजपचे दाखवायचे दात तर वेगळेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘ज्याने  हत्या केली त्याचा फोटो मी पाहिला असून तो केडगाव पाेटनिवडणुकीतील विजयी उमेदवाराला खांद्यावर घेऊन नाचतोय. तोच आरोपी आमदारांबरोबर बूथवरही होता. संघटित गुन्हेगारीतून हा हल्ला झाला आहे. यासंदर्भात सोमवारी (९ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करणार आहे ,’ अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगरमध्ये दिली.


मृत कुटुंबीयांचे भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना कदम म्हणाले, ‘हत्येच्या घटनेचा मी निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजप या तिघांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे. नगरमध्ये भविष्यात कायदा व सुव्यवस्था राखली गेली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने काम करेल,  असा इशाराही रामदास  कदम यांनी अापल्याच सरकारला दिला.

 

भाजपचे दाखवायचे दात तर वेगळेच
आमदार शिवाजी कर्डिले व अामदार जगताप हे जवळचे नातेवाईक आहेत.  राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपने एकत्र येऊन केडगाव निवडणुकीत शिवसेनेला शह दिला. भाजपचे खायचे दात एक व दाखवायचे दात वेगळे आहेत. एकीकडे युती सांगायची व शिवसेनेच्या मुळावर घाव घालायचा हे त्यांचे धंदे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत, असा अाराेप कदम यांनी केला.

 

'त्या' पोलिसांनी पोलिसांना निलंबित करा...

कदम यांनी सांगितले की, नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून  पोलिसांच्या संगनमतामुळे गुंडांना अभय मिळत आहे. डीवायएसपी अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने हे हत्याकांड झाले आहे. त्यामुळे आधी या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा, असे रामदास कदम म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांना भेटणार..

शिवसेना कुठल्याही परिस्थितीत या गुन्हेगारांना मोकळे सोडणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांच्याकडे योग्य ती मागणी करणार आहे.

 

दरम्यान, केडगाव उपनगरातील शाहूनगर भागातील सुवर्णनगर येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय केशव कोतकर यांच्यासह एकाच गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्येच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नगर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून रविवारी केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना पोलिसांनी रविवारी पहाटे 3 वाजता अटक केली.

बातम्या आणखी आहेत...