आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांबद्दल अपशब्द; श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर-  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेला भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याला न्यायालयाने शनिवारी १४ दिवसांची कोठडी सुनावली. छिंदमने केलेल्या वक्तव्यामुळे नगर शहरासह राज्याच्या काही भागांत तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगर-सोलापूर रोडवर शिराढोण शिवारात छिंदम लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून पोलिस ठाण्यात आणले. त्याला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला १ मार्चपर्यंत कोठडी सुनावली.

 

हेही वाचा... छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द; श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

छिंदम याला सबजेलमधून हलवण्याच्या हलचाली सुरु..
छिंदम याला तुरुंगात कैद्यांनी मारहाण केल्याच्या घटनेला प्रशासनाकडून दुजोरा मिळाला नसला तरी त्याला सबजेलमधून हलविण्यात यावे, असे पत्र तुरुंग प्रशासनाकडून कोर्टात सादर करण्‍यात आले आहे. प्रकरण संवेदनशिल असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी छिंदम याला सबजेलमधून हलवावे, अशा आशयाचे पत्र तुरुंग प्रशासनाने कोर्टात दिल्याचे सांगितले जात आहे.

 

पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवणार?
सुरक्षेच्या मुद्द्यावरून छिंदम याला पुण्यातील येरवडा कारागृहात हलवणार असल्याची शक्यता आहे. छिंदमच्या जीवाला धोका असल्याने  त्याला नगर सबजेलमधून पुण्याला हलवण्याच्या हलचाली सुरु झाले आहे.

 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याला काल (शुक्रवार) पोलिसांनी रात्री छिंदमला अटक केली. तोफखाना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छिंदम याला आज (शनिवार) सकाळी 8 वाजता कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...