आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यावरुन छिंदमची कोलांटउडी; म्हणाला, शिवसेनेच्या महापौरांनीच केली बनावट स्वाक्षरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बडतर्फ झालेला अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आता कोलांटउडी घेतली आहे.

 

'आपण राजीमाना दिला नाही. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडवर राजीनामा लिहून त्यावर बनावट स्वाक्षरी करून तो मंजूर करून घेतला,' असा आरोप छिंदम याने केला आहे. शिवसेनेने राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी छिंदम याने केली आहे.

 

दुसरीकडे, भाजप खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी केली होती. आता मात्र, छिंदमच्या या दाव्याने खासदार गांधी यांची चांगलीच कोची झाली आहे.

 

नेमके काय आहे हे प्रकरण?
श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाचा गैरवापर करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी राज्यभरात शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. महापालिकेच्या महासभेत छिंदमचे उपमहापौरपदासह नगरसेवक पदही रद्द करण्‍यात आले होते. छिदंमविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा अटकही करण्‍यात आली होती. नंतर त्याला एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.

 

दरम्यान, नगरविकास विभागाने छिंदमला मे महिन्यात नोटीस बजावून दहा दिवसांत म्हणणे मांडण्यास बजावले होते. छिंदमने जून महिन्यात नोटीसला उत्तर देऊन राजकीय षडयंत्राची फोडणी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्या आणखी आहेत...