आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना अामदाराच्या गाडीवर शिवसैनिकांकडूनच दगडफेक; ठाकरेंच्या कार्यक्रमानंतर नगर जिल्ह्यात गटबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पारनेर (जि. नगर) येथे मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात अाला. मात्र, यानंतर कारची धडक लागल्याचे निमित्त करून शिवसेनेच्या दाेन गटांत तणाव निर्माण  झाला हाेता.  


अभीष्टचिंतन कार्यक्रमानंतर संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आमदार विजय औटी, उपनेते अनिल राठोड, जि. प. सदस्य  संदेश कार्ले हे सर्वजण उद्धव ठाकरे यांना घेऊन गाड्यांच्या ताफ्याकडे निघाले.  शिवसैनिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. ठाकरे कारमध्ये बसल्यानंतर त्यांच्या पाठीमागे असलेल्या आमदार औटी यांच्या कारचालकाने वेगात गाडी काढली. त्या वेळी गाडीचे पुढचे चाक उपनेते अनिल राठोड व संदेश कार्ले यांच्या पायावरून गेले, यात त्यांना किरकाेळ मार लागला. मात्र या प्रकारामुळे संतप्त राठाेड समर्थकांनी आमदार औटी यांच्या कारवर दगडफेक करून काचा फोडल्या. तर काही शिवसैनिकही या दगडफेकीत जखमी झाले. दगडफेक सुरू होईपर्यंत ठाकरे यांची कार तेथून निघून गेली होती.  नंतर राठोड व कार्ले यांना उपचारांसाठी नगरला नेण्यात आले. दरम्यान, ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याच्या अफवा पसरल्या.   

 

बातम्या आणखी आहेत...