आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री गरजेचा- उद्धव ठाकरे, सरकारला शिवरायांचे नाव घेण्याचा हक्क नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भाजप सरकार गुंडांना पक्षात घेऊन त्यांना ‘वाल्मीकी’ करत आहे, हा वाल्मीकींचाही अपमान आहे. राज्यात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना माता-भगिनींचा आक्रोश ऐकू येत नाही. त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री गरजेचा आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.


ठाकरे यांनी नगरमध्ये मृत शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रपरिषदेत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गृह खाते स्वत:कडे ठेवले आहे. शिवरायांच्या राज्यात माता-भगिनींचे कुंकू पुसले जात नव्हते. आता मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे या सरकारला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सेनेच्या मंत्र्यांनी आपले अधिकार वापरले तर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये.

 

शिवसैनिकांच्या मारेकार्‍यांना फासावर लटकवा..

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या मारेकर्‍यांना फासावर लटकायला हवे. सूत्रधार किंवा सुपारी देणारेही फासावर लटकले पाहिजेत. मग ते सत्ताधारी पक्षाचे का असेना, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हत्येचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. आयपीएस कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हायला हवी.  खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवी.  वकीलपत्र उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावे, मी स्वत: निकम यांना कॉल केला आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला वाढत्या उन्हाचा फटका

बातम्या आणखी आहेत...