आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव दुहेरी हत्याकांड; भानुदास कोतकर ताब्यात; आज करणार न्यायालयात हजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडातील फरार असलेला संशयित आरोप व लॉटरीविक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व सध्या जामिनावर बाहेर असलेला भानुदास कोतकर याला पोलिसांनी सोमवारी पुण्यातून ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला (१५ मे) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


केडगाव येथे महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून ७ एप्रिलला शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हे दाखल केले. या घटनेतील संशयित असलेला आरोपी भानुदास कोतकर हा फरार होता. केडगाव हत्याकांडप्रकरणी कोतकर याला पोलिसांनी स्टँडिंग वाँरट बजावले होते. त्याचबरोबर कोतकर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी (१७ मे) सुनावणी होणार होती. मात्र, त्यापूर्वीच कोतकर याला पोलिसांनी ताब्यात घेतेले. येरवडा (पुणे) येथील पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी कोतकर आला असता त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...