आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी बससेवा पुन्हा सुरु होणार; श्रीगोंदा आगार प्रमुखांनी गावाला भेट देऊन दिले आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- श्रीगोंदे-कोपर्डीबस विद्यार्थ्यांसाठी सुरू होती. तांत्रिक अडचणीमुळे चार दिवसांपासून ती बंद करण्यात आली होती. सोमवारपासून (११ डिसेंबर) बससेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन शनिवारी श्रीगोंदे आगारप्रमुख एस. एस. सुतार यांनी ग्रामस्थांना दिले. 


कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंंतर श्रीगोंदेे ते कोपर्डी बससेवा श्रीगोंदे आगाराने बंद केली होती. सहलीसाठी मोठ्या प्रमाणात बसची मागणी नोंदवण्यात आल्याने ही बस बंद करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सुतार यांनी दिले आहे. पण बस बंद करताना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने सरपंच, पोलिस पाटील, विद्यार्थी पालक यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


बसचा तुटवडा 
श्रीगोंदेआगाराकडे एकूण ६७ बस असून तीन गाड्या आरटीओ पासिंगसाठी नगर येथे पाठवल्या आहेत, तर दोन गाड्या बॉडी वेल्डिंगसाठी नागपूरला पाठवण्यात आल्या आहेत. तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी प्रासंगिक करारसाठी (शैक्षणिक सहल) बसचे बुकिंग केले होते. त्यामुळे बसचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समजली.

 

दुसर्‍याच दिवशी बससेवा बंद..
राज्य नव्हे तर देशाला हादरुन सोडणार्‍या कोपर्डीच्या घटनेनंतर शाळकरी मुलींमध्ये प्रचंड भीती पसरली होती. अनेक मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. त्यामुळे महामंडळाने श्रीगोंदा ते शिंदा ही बस सुरु केली होती. या बसला कुळधरण, कोपर्डी थांबा देण्‍यात आला होता. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थींनी पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केली होती. मात्र, 29 तारखेला कोपर्डीचा निकाल लागताच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 तारखेलाच महामंडळाने बस बंद केली.  याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेेष म्हणजे विद्यार्थ्यांनी मासिक पासही काढला आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

 

कोपर्डीत पहिली ते चौथीपर्यंत शाळा...

कोपर्डी गावात केवळ प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शिक्षणासाठी कोपर्डीतल्या मुलांना कुळधरण किंवा शिंदा येथील शाळेत जावे लागते. रस्त्यात जंगल आणि झाडा-झुडपांचा असल्याने मुलींनी भीती वाटते. त्यात कोपर्डीतील छकुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने मुलींनीमध्ये अजूनही भीती पसरली आहे. काही मुलींनी शाळा बंद केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या 13 जुलै 2016 रोजी काय घडले होते कोपर्डीत?

बातम्या आणखी आहेत...