आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोते बंधुंनी उचलली दोन मुलांची शैक्षणिक जबाबदारी; जवान राजेंद्र जगताप यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- पाकिस्तानशी लढताना गेल्या महिन्यात बॉर्डरवर गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान व निमगाव कोऱ्हाळे गावाचे सुपुत्र राजेंद्र जगताप यांची बुधवारी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते आणि साई निर्माण ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कोते बंधुंनी घेतली असून साई निर्माण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात पुढील सर्व शिक्षण मोफत करणार असल्याचे जाहीर केले. या मदतीमुळे जगताप आणि त्यांच्या परिवाराला गहिवरून आले. 


२३ मे २०१८ ला सकाळी ८ च्या सुमारास सांबा बॉर्डरच्या सीमा चौकीवर जगताप तैनात असताना पाकिस्तानी सैन्याने बॉम्बचा मारा केला. जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख प्रत्युत्तर देत दोन पाकिस्तानी बंकर, एक टॉवर व इम्रान पोस्ट उद््ध्वस्त केली. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या रॉकेट लाँचरच्या हल्ल्यात जगताप यांच्यासह तीन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जम्मू येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर जगताप सुटीसाठी गावी आले आहेत. 


निमगाव कोऱ्हाळे येथील जगताप यांच्या निवासस्थानी कैलास कोते व विजय कोते यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. साईबाबांची मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी साई निर्माण पतसंस्थेचे संचालक धनंजय साळी, संजय गोंदकर उपस्थित होते. जगताप यांच्या एका मुलीची व मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी कोते बंधुंनी घेतली. या दोघांना साईनिर्माण प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोफत शिक्षण देणार येणार आहे. जगताप कुटुंबीयांनी त्यास संमती दिली.

बातम्या आणखी आहेत...