आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेला बिबट्या आठ तासांनंतर जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- शेवगाव तालुक्यातील खामपिंप्री शिवारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऊसतोड कामगार असलेल्या महिलेच्या अंगावर झडप घेताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. दरम्यान, जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात होत असून यापूर्वीही येथील परिसरात बिबट्या दृष्टीस पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. 


शुक्रवारी सकाळी खामपिंप्री शिवारातील पैठण उजवा कालव्याच्या पाच क्रमांकाच्या वितरिकेजवळ किसन नानासाहेब पावसे यांच्या मालकीच्या गट नंबर ७८ शेतामध्ये ऊसतोड सुरू होती. महिला कामगार मंगलबाई पवार (मूळ रा. लाडजळगाव) यांच्या अंगावर बिबट्याने झडप घातली. मात्र, पवार या उसाची मोळी बांधण्यासाठी खाली वाकलेल्या असल्याने बिबट्या विहिरीत पडला. विहिरीच्या कड्या कपारीने पोहणारा बिबट्या काही वेळाने मात्र दमला होता. त्यास धरून बसण्यासाठी कुठलेही साधन नसल्याने त्यास पकडण्यासाठी सोडलेल्या खाटेवर तो बसला. घटना समजताच पाथर्डी येथील वनविभागाचे वनपाल एम. बी. राठोड, शेवगावचे वनपाल सी. ए. रोडे हे १० ते १५ कर्मचाऱ्यासह विहिरीजवळ आले. 


शेवगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन मगर हेही घटनास्थळी हजर झाले. वनाधिकाऱ्यांनी विहिरीच्या काठावर बोरी-बाभळीच्या काट्यांचे कुंपण करून विहिरीत सोडलेल्या बाजेवर बिबट्या चढला. तद्नंतर शिडीवर चढून वर आलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. 


महिलेवर हल्ल्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत 
खामपिंप्री शिवारातील ऊसतोड महिला कामगारावरील हल्ल्याच्या प्रयत्नात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुमारे आठ तासांनंतर जेरबंद करण्यात यश मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...