आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; तेगाव घाटातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ७.४५ च्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाची त्याला धडक बसली. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेले वाहन लगेच पसार झाले.

 

परिसरातील नागरिकांनी वनमजूर बंडू गोरे यांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ वनरक्षक ए. ए. जाधव व वनपाल पी. एस. जगताप तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खासगी वाहनाने बिबट्याला पारनेर येथील वनविभागात आणले. सकाळी शवविच्छेदन करून वनजमिनीत बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला. 


जातेगाव घाटात वनजमीन मोठ्या प्रमाणात असून या परिसरात वन्यप्राण्यांची नेहमी वर्दळ असते. हरणांचे कळप जास्त प्रमाणात आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...