आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या झटक्याने पानेगावात एकाचा मृत्यू, नेवासे तालुक्यातील पानेगाव येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- घराच्या पडवीत बांधलेल्या तारेत वीजप्रवाह उतरला. त्यावरील टॉवेल घेत असताना विजेचा झटका बसून तालुक्यातील पानेगाव येथील सोपान सूर्यभान खडके (वय ४४) यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, वडील, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. 


खडके मुळा कारखान्यात बॉयलर विभागात कामाला होते. कामावरुन ते घरी आले होते. ओले झालेले कपडे बदलत असताना ही घटना घडली. विजेचा झटका बसल्याने खडके खाली कोसळले. त्यांची भावजय, तसेच शेजारी असलेले गणेश चिंधे यांच्या ते लक्षात आले. गावातील रोहित्र तातडीने बंद करण्यात आला. खडके यांना त्यांचे बंधू ज्ञानेश्वर खडके, गणेश चिंधे, सतीश जंगले यांनी मांजरी येथील दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी श्रीरामपूर येथे जाण्यास सांगितले. खडके यांचा रस्त्यातच अंत झाला. त्याच दिवशीच महावितरणच्या नेवासे येथील उपअभियंत्यास ही माहिती देऊनही संबंधित विभागाचे कर्मचारी फिरकलेसुध्दा नाहीत. दुसऱ्या दिवशी महावितरणचे कर्मचारी आल्यावर प्रवाह तारेत उतरला कसा हे बघितले असता कोटेशन केबल कट झाल्याने वीजप्रवाह तारेत उतरल्याने हा प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...