आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जुले हर्या येथे मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- दुधाचे दर पडल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, प्रवक्ते संतोष हांडे आणि युवक तालुकाध्यक्ष रोहन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली कर्जुले हर्या येथे मोफत दूध वाटप करत मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला. 


यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरी उंडे, संदीप आंधळे, शशिकांत आंधळे, श्रीहरेश्वर दूध संकलन केंद्राचे सुरेंद्र माने, विष्णू दाते, दत्ता काळे, संग्राम उंडे, देवराम वाफारे, विनायक उंडे, सुभाष आंधळे, राजू आंधळे, प्रकाश उंडे, मच्छिंद्र आंधळे, बाळू उंडे, हरी उंडे, विजय उंडे, नानाभाऊ माने व असंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे यांनी सरकारला इशारा दिला की, ९ मेपर्यंत दुधदराचा तिढा सोडवला नाही, तर भूमिपुत्र शेतकरी संघटना हजारो शेतकऱ्यांसह मंत्रालयात जाऊन मोफत दूध वाटप करेल. 

 

दूध भेसळ हा फार गंभीर मुद्दा असूनही सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. शेतकऱ्यांकडून जे ३.५ फॅटचे दूध तुम्ही घेता, तेच दूध जर ग्राहकाला मिळाले, तर सकस दुधाची मागणी वाढेल आणि अतिरिक्त दुधाचा प्रश्न राहणार नाही, पण दुर्दैवाने ग्राहकाला गायीचे सकस दूध मिळत नसल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...