आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत येणारे दूध कोणत्याही परिस्थितीत अडवणारच; खासदार राजू शेट्टी यांचा निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- गुजरात, कर्नाटक राज्यातून मुंबईला होणारा दूध पुरवठा कोणत्याही परिस्थितीत अडवला जाईल, तसा बंदोबस्त केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहा दिवस साथ देत दुधाचा एक थेंबही बाहेर जाऊ देऊ नये, असे आवाहन करत दूध दरवाढीसाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 


नगर तालुक्यातील निमगाववाघा येथे दूध दर आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित शेतकरी मेळाव्यात शेट्टी बोलत होते. या वेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कोर्ले, भारत फलके, राजू नरवडे, आनंदा जाधव, अरुण फलके, अंबादास जाधव, गोकूळ जाधव, सरपंच अनिल डोंगरे, उपसरपंच शंकर गायकवाड, भाऊसाहेब घोलप, संकेत कडूस, दीपक कार्ले, रवी मोरे, राजू ठुबे, दादा ठाणगे, भाऊ कदम, जयवंत जाधव, सुरेश शिंदे, पोपट शिंदे, राजू भगत, अरुण कापसे, गणेश साठे आदी उपस्थित होते. 


खासदार शेट्टी म्हणाले, केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचा व देशी जनावरे पाळण्याचा सल्ला देतात. मात्र, अतिरिक्त उत्पादन झालेली दुधाची पावडर व बटरबाबत निर्णय घेण्याची सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करतात. दूध निर्यातीस कुठल्याही प्रकारचा वाव नाही. त्यामुळे निर्यातीला अनुदान देऊन उपयोग होणार नाही. राज्य सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा. अतिरिक्त उत्पादित झालेले दूध महानंदतर्फे २७ रुपये लिटर दराने खरेदी करायला हवे. पर्यायाने शेतकऱ्यांना वाढीव दर देता येईल. 


शेट्टी म्हणाले, मुंबईचा दूध पुरवठा रोखला, तरच सरकार जागे होईल. या आंदोलनास गुजरात, कर्नाटकमधूनही पाठिंबा मिळत आहे. तिकडून मुंबईला येणारा दूध पुरवठा तिकडेच रोखला जाणार आहे. महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा आहे. आपण सगळ्यांनी एकजूट दाखवल्यास या सरकारला दूध दरवाढ करायला भाग पडू, असेही शेट्टी म्हणाले. 


आंदोलनामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली 
अकरा वर्षांपूर्वी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. ते यशस्वी झाले. ऊसप्रश्नी आंदोलन केल्यामुळेच उसाला ३२०० रुपये भाव मिळाला. दुधाचे आंदोलनसुद्धा यशस्वी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतल्याने सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शेतकऱ्यांची एकजूट काय असते दाखवून द्या. शेतकरी इरेला पेटला, तर काय होते हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे शेट्टी म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...