आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा गुरूवारी ठोठावण्यात आली. तालुक्यातील कारवाडी येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या जोडप्याच्या सात वर्षांच्या मुलीवर शंकर पांडुरंग गायकवाड याने बलात्कार केल्याचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

 

तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी करुन दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीस न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष कारावास, अशी शिक्षा ठोठावली. भादंवि ३६३ प्रमाणे ५ वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास, बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याप्रमाणे १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावास याप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. कामकाज वकील बाबासाहेब पानगव्हाणे यांनी पाहिले.

 

बातम्या आणखी आहेत...