आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरीविरोधी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी कामाला लागा -आमदार वैभव पिचड पिचड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात १५ वर्षे सत्तेत असताना राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांना साथ देऊन भारत हा शेतमाल निर्यात करणारा देश बनवला. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकरीविरोधी सरकारला २०१९ मध्ये सत्तेतून घालवण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करून त्या दृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन आमदार वैभव पिचड यांनी केले. 


रविवारी राष्ट्रवादीचा २० व्या वर्धापन दिनानिमित्त अकोलेतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आ. पिचड कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. या वेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, मीनानाथ पांडे, पक्षाचे सचिव यशवंत आभाळे, नगराध्यक्षा संगीता शेटे, तालुका महिला अध्यक्षा चंद्रकला धुमाळ, तालुका युवक अध्यक्ष शंभू नेहे आदी उपस्थित होते. या वेळी सीताराम गायकर, मधुकर नवले, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव याचीही भाषणे झाली. या वेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सुभद्रा नाईकवाडी, स्वाती शेणकर, सचिन शेटे, नामदेव पिचड, परशराम शेळके, प्रकाश नाईकवाडी, प्राचार्य संपतराव नाईकवाडी, विक्रम नवले, सुरेश लोखंडे, सुरेश गडाख, सुनील दातीर, राजेंद्र डावरे, भाऊ पाटील नवले, गोरख मालुंजकर, बाळा नवले, ढोक्रीचे माजी सरपंच विकास शेटे, प्रकाश साळवे, प्रा. भूषण जाधव, राहुल बेनके, कुमुदिनी पोखरकर, कविराज भांगरे, विजय लहामगे, शशिकांत देशमुख, प्रवीण वाकचौरे, गोरख वाकचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...